नवी मुंबईतील खारघरमधील हिरानंदानी पुलावरून एक दाम्पत्य आपल्या स्कुटीवरून जात असताना मागून आपल्या आलिशान मर्सिडीजमधून 19 वर्षीय तिथी सिंग तरुणी भरधाव वेगात आली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कुटीला तिने मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात स्कुटीवरील गोपाळ यादव आणि त्यांच्या पत्नी जोरात खाली पडली. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Jun 21, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पापा की परी' मर्सिडिजमधून आली, दोघांना उडवले, महिलेचा जागीच मृत्यू, नवी मुंबईतली घटना
