TRENDING:

'सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांसाठी अडथळे...', राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

Last Updated:

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही गटाचं विलीनीकरण व्हावं, ही अजित पवारांची इच्छा होती. त्या अनुषंगाने त्यांनी बैठका देखील घेतल्या होत्या, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. पण अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी यूटर्न घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडला आहे.
News18
News18
advertisement

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. तेव्हा सुनेत्रा पवारांसोबत एक दोन वेळा भेट झाली होती, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. शिवाय सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हादेखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती. सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3201 शिवलिंगांचे शिवमंदिर, गुप्त 12 ज्योतिर्लिंगांचीही दर्शन,कुठे आहे हे ठिकाण?
सर्व पहा

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या विलीकरणाची चर्चा तूर्तास बंद करत आहोत, असं वक्तव्य शिंदे यांनी केलं आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आक्षेप घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी देखील माघार घेतली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांसाठी अडथळे...', राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल