दिल्ली : "जर तर वर मी बोलणार नाही. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. आज शशीकांत शिंदे यांनी लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी चुकीचं लिखाण केलं आहे. असं लिखाण त्यांनी करू नये, जर असं लिखाण वारंवार होत असेल तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर देईन, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.
advertisement
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावरून वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तकरेंनी आक्षेप घेतला आहे.
"मी वारंवार या विषयावर स्पष्टपणे सांगितलंय की सुनेत्रा वहिनी आहेत. नेते मंडळी आहेत. ते चर्चा करू शकतात. एखाद्या आघाडीत नवीन पक्ष सोबत येत असतात तेव्हा मुख्य पक्षाला विश्वासात घ्यावं लागतं. आता एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. आमच्यावेळी ही भाजपनं सांगितलं मग आम्ही एनडीएमध्ये गेलो. शशिकांत शिंदे म्हणाले पण पुढे ते बोलले की, अदृश्य हात आणि धमक्यांमुळे अजितदादांना बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला. या शब्दांना माझा आक्षेप आहे, असं म्हणत तटकरेंनी शशीकांत शिंदेंच्या लेखावर आक्षेप घेतला.
तसंच' अजितदादांनी काय इच्छा लपवून ठेवली नव्हती. सर्वांना सांगितले होते. शशिकांत शिदेंचं लिखाण अनाठायी आहे. गैर आहे. जबाबदार जुने सहकारी आहेत पण याचा हेतू काय आहे हे माहित नाही. या लेखाचे शिर्षक काय आहे पाहा. अजितदादांच्या निधनानंतर हा लेख लिहिला आहे. त्यानंतर आता काय बोलायचंय विलिनीकरणाबाबत लिहलंय. असं का बोलतात मला माहित नाही. जर ते वारंवार असं विधान करणार असेल तर राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला उत्तर द्यावं लागेल, असा इशाराही तटकरेंनी दिला.
'हिरामण खोसकरांची भूमिका आमदार म्हणून'
"हिरामण खोसकर यांच्याशी मी बोलेन. अजितदादांनी त्यांना उमेदवारी दिली मग आमदार झाले. आता पण त्यांना रात्री किती वाजता उमेदवारी दिली हे मला माहिती आहे. आम्ही एकत्रित बसून चर्चा करू. हिरामण खोसकरांचं मत जाणून घेऊ. खोसकर यांनी आमदार म्हणून भावना व्यक्त केली. एनसीपी एनडीएचा घटकपक्ष आहे. तो घटकपक्ष म्हणून राहणार आहे' असंही तटकरेंनी ठणकावून सांगितलं.
