TRENDING:

चंद्रपुरात भाजपने गेम केला, परभणीत सेना-काँग्रेसला धास्ती, नगरसेवक सहलीला

Last Updated:

परभणी महापौर: महापौर निवडणुकीच्या आधी ठाकरे गट आणि काँग्रेसचे नगरसेवक सहलीवर गेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी : परभणी महापालिकेच्या उद्या होत असलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या आधी परभणी महानगरपालिकेतील ठाकरे गट आणि काँग्रेसचे नगरसेवक सहलीवर गेले आहेत. चंद्रपुरात ठाकरे सेना-काँग्रेसकडे बहुमताचा आकडा असूनही भाजपने ठाकरे सेनेला ऑफर देऊन आपल्याकडे खेचले. चंद्रपुरातील सत्तापालटाचा धसका घेऊन आपल्यातील नगरसेवक फुटू नयेत त्यामुळे दोन्ही पक्षांनी आपापले नगरसेवक सहलीला नेले आहेत.
चंद्रपूर महापालिका-परभणी महापालिका
चंद्रपूर महापालिका-परभणी महापालिका
advertisement

भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जात असल्याचा चर्चा नंतर काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडून खबरदारी म्हणून नगरसेवकांना हैदराबाद आणि मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. उद्या ऐन निवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्षाचे नगरसेवक मतदानाला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

परभणी महापालिकेसाठी महापौर पदासाठी १४ तर उपमहापौरपदासाठी ७ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्याने चुरस वाढली आहे. परभणीत बहुमतासाठी ३३ आकडा हवा आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यास त्यांचा महापौर सहज होऊ शकतो, मात्र दोघांनीही स्वतंत्र अर्ज भरल्यामुळे गुरूवारी कोण माघार घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

परभणी महापालिकेतील ​पक्षीय बलाबल कसे आहे?

​उद्धव ठाकरे यांची शिवसेना: २५

​काँग्रेस: १२

​भाजप: १२

​राष्ट्रवादी: ११

​इतर: ५

चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत काय घडले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

चंद्रपुरात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सत्ता समीकरणांची जुळजाजुळव करून काँग्रेसचा महापौर बसेल, असे सगळ्यांनाच वाटत होते. धानोरकर-वडेट्टीवार गटाला सत्तेच्या वाटाघाटीत प्रमुख पदे हवी होती. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चेच्या लाथाळ्यात जवळपास १०-१५ दिवस उलटले. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाने ठाकरे सेनेशी बोलून गणित जुळवून आणले. जनतेने मते देऊन काँग्रेसला सर्वाधिक नगरसेवक जिंकून दिले खरे पण अहंकारापोटी शिवसेनेला विचारात न घेतल्याने काँग्रेसचे गर्वहरण झाले. दैव देते आणि कर्म नेते या म्हणीप्रमाणे हातून महापालिका जाण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चंद्रपुरात भाजपने गेम केला, परभणीत सेना-काँग्रेसला धास्ती, नगरसेवक सहलीला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल