TRENDING:

Nashik: मजुरी करून घरी चालले होते, पिकअप व्हॅनची स्कुटीला धडक, मायलेकाचा जागेवरच मृत्यू, दृश्य पाहून लोक रडले

Last Updated:

सिंधुबाई या चांदोरी इथं मोलमजुरीचं काम आटोपून आपल्या मुलासह स्कुटीनं घरी जात होत्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या पिकअप

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

नाशिक: श्रीरामपूरमध्ये कार अपघाताची घटना ताजी असताना आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात भीषण अपघात झाला आहे.  राज्य महामार्ग क्रमांक 36 वर भरधाव पिकअप व्हॅनने स्कुटीला जोराची धडक दिली.  हा अपघातात आई-मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर  तीन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात चांदोरी शिवारातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३६ वर बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चांदोरीकडून ओझरच्या दिशेने स्कुटीवरून जात असलेल्या आई आणि मुलाला मागून येणाऱ्या एका भरधाव पिकअप व्हॅनने जोराची धडक दिली. या अपघातात आई आणि मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. तर भरधाव पिकअप व्हॅन उलटल्यानंतर कारलाही धडकला.

advertisement

या अपघातात सिंधुबाई अर्जुन गायकवाड (वय ४२)आणि त्यांचा मुलगा कुणाल अर्जुन गायकवाड (वय १२) या दोघांचाा जागीच मृत्यू झाला. सिंधुबाई या चांदोरी इथं मोलमजुरीचं काम आटोपून आपल्या मुलासह स्कुटीनं घरी जात होत्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या पिकअप क्रमांक एमएच १८ एए ५२४३ च्या ड्रायव्हरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि समोर असलेल्या स्कुटीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, स्कुटीसह आई आणि मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. पिकअप व्हॅनची धडक इतक्या जोरात होती की, स्कुटीचा चक्काचूर झाला.

advertisement

पिकअपची कारलाही धडक

स्कुटीला धडक दिल्यानंतर भरधाव पिकअप पुढे जाऊन एका मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायरला धडकला. या धडकेत कारच्या मागील भागाचं मोठं नुकसान झालं. या अपघातात ३ प्रवासी जखमी झाले आहे. स्थानिक वाहनचालकांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींनी  १०८ रुग्णवाहिकेला बोलावून तातडीने रुग्णालयात हलवलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली. हा अपघातात अतिवेगाने वाहन चालवल्यामुळे घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: मजुरी करून घरी चालले होते, पिकअप व्हॅनची स्कुटीला धडक, मायलेकाचा जागेवरच मृत्यू, दृश्य पाहून लोक रडले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल