TRENDING:

पिंपरी-चिंचवडमधल्या स्पा सेंटरवर देहविक्री, पोलिसांना टीप मिळाली, अन् रॅकेट उद्ध्वस्त

Last Updated:

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापेमारी करत सहा महिलांची सुटका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये स्पा सेंटर आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विशालनगर, निगडीसह विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
स्पा सेंटर आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई
स्पा सेंटर आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात कारवाई
advertisement

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापेमारी करत सहा महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी संबंधित स्पा चालक आणि मॅनेजरविरोधात पीटा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या कारवाई विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तसेच कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉजवर छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

advertisement

स्पा सेंटर्समधील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे आणि पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

'इंटरनल फॅमिली स्पा'वर पोलिसांनी धाड टाकून अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक केली. तेथील महिलेसह मॅनेजरवर 'पीटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंपरी-चिंचवडमधल्या स्पा सेंटरवर देहविक्री, पोलिसांना टीप मिळाली, अन् रॅकेट उद्ध्वस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल