TRENDING:

Prashant Koratkar : Exclusive : छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, पोलीस मागावर, प्रशांत कोरटकर कुठं पळाला?

Last Updated:

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये दाखल झाले आहे. पण, प्रशांत कोरटकर नागपूरमधूनच पसार झाला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याचा आरोपावरून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डॉ. प्रशांत कोरटकर अडचणीत आला आहे. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरने माध्यमांसमोर येत तो आवाज आपला नाही असे स्पष्टीकरण दिले. माध्यमांना मुलाखती देणारा प्रशांत कोरटकरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये दाखल झाले आहे. पण, प्रशांत कोरटकर नागपूरमधूनच पसार झाला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

कोल्हापुरचे तपास पथक प्रशांत कोरटकरच्या मनीष नगर निवासस्थानी आले आहे. प्रशांत कोरटकर परिवारासह दोन दिवसांपासून घरी नसल्याची माहिती आहे. कोरटकरच्या घराला टाळं लागलं आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलीस पथक काय करणार याकडे लक्ष आहे. याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक नागपुरात दाखल झालेत. पण कोरटकर घरी नसल्याचे समोर आले आहे.

advertisement

कुठं पळालाय प्रशांत कोरटकर?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर इंदूरमध्ये असल्याची 'न्यूज18 लोकमत'ला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. प्रशांत कोरटकर हा आपल्या एका मित्रासोबत इंदूरला गेल्याची माहिती आहे. कोरटकरनं प्रथम नागपूर ते इंदूर दरम्यान विमान तिकीट बुक केलं होतं. मात्र ऐनवेळी कोरटकरनं तिकीट रद्द करून तो कारनं इंदूरला गेल्याची माहिती 'न्यूज 18 लोकमत'ला सूत्रांनी दिली. नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोरटकर शहराबाहेर गेल्याने त्याला नेमकं कोण वाचवतंय याची चर्चा आता रंगू लागली आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ब्राह्मण समाजाला का लक्ष्य करत आहे असा जाब विचारणारा फोन कोरटकर यांनी केला होता. त्या दरम्यान कोरटकर यांनी काही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंत यांना शिवीगाळ केली होती. ‘तुला घरात येऊन मारेल, हा फायनल कॉल आहे’ असं म्हणत सावंत यांना धमकी दिली होती. एवढंच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल कोरटकर याने अत्यंत खालच्या शब्दांत भाष्य केलं होतं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prashant Koratkar : Exclusive : छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, पोलीस मागावर, प्रशांत कोरटकर कुठं पळाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल