TRENDING:

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, रोहित पवार प्रतिवादी

Last Updated:

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही मीटर अंतरावर अपघात झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवार यांच्या कथित अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अपघाताच्या सखोल तपासासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी जनहित याचिकेतून केली आहे.
अजित पवार
अजित पवार
advertisement

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही मीटर अंतरावर अपघात झाला. कमी दृश्यमानता आणि विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे डीजीसीएने विमान कंपनीकडे बोट दाखवून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून कंपनीशी संबंधित विमानांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भाने सीबीआय चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यासंबंधी पत्रही लिहिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केतन तिरोडकर यांनी दादांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे.

advertisement

आयोगात विमान कंपनीच्या मुख्य देखभाल अभियंत्याचा समावेश करावा

आयोगात डीजीसीएचे (DGCA) निवृत्त संचालक आणि एअर इंडियासारख्या विमान कंपनीच्या मुख्य देखभाल अभियंत्याचा समावेश करण्याची मागणी त्यांनी जनहित याचिकेतून केली आहे. या प्रकरणी सीआयडीमार्फत अपघाती मृत्यूची नोंद करून स्वतंत्र चौकशीचे निर्देश देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

90 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने द्यावेत, याचिकेतून अपेक्षा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबास 13250 रुपये भाव, आले आणि द्राक्षाची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

रोहित पवार यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. रोहित पवार यांच्याकडे असलेली संबंधित माहिती न्यायिक आयोगासमोर सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करून न्यायिक आयोगाने 90 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा त्यांनी याचिकेत नमूद केली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, रोहित पवार प्रतिवादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल