अजित पवार यांच्यासोबत बैठक फिस्कटल्यानंतर गेल्या दोन दिवसात शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र कालपासून अचानकपणे शरद पवार यांच्या पक्षातील कोणतेही पदाधिकारी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बैठकीला उपस्थित राहत नाहीयेत.
यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, मविआची भूमिका
आजही महाविकास आघाडीची नियोजित बैठक होती. तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी बैठकीला आलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळे लढण्याची भूमिका घेतली. त्याचवेळी मनसे सोबत येते का, याचीही चाचपणी केली. तसेच यापुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बैठकीला बोलवायचे नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला.
advertisement
मविआच्या बैठकीत प्रशांत जगतापही
दुसरीकडे काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुरू असलेल्या बैठकीला काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप हेही उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत काहीसे अस्वस्थ पाहायला मिळाले.
