Krishi Market: शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Krishi Market: राज्यातील विविध कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांचे बाजारभाव जाणून घेऊ.
मुंबई: राज्यात थंडीचा कडाका वाढला असून कृषी मार्केटमध्ये मोठे उलटफेर दिसत आहेत. शनिवार, दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यातील विविध कृषी मार्केटमध्ये कमी-अधिक प्रमाणात शेतमालाची आवक झाली. आपण यातील महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि भाव यांबाबत जाणून घेऊ.
गुळाच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1126 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सोलापूर बाजारात 365 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3450 ते 4401 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 360 क्विंटल गुळास 4413 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 17 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी सातारा बाजारात सर्वाधिक 12 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5000 ते 6500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल शेवग्यास 25000 ते 35000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
डाळिंबाला 19 हजारापर्यंत भाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 258 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी अमरावती मार्केटमध्ये 67 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 9000 ते 13000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 39 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 4700 ते 19000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Krishi Market: शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?








