TRENDING:

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, महाविकास आघाडीत फूट; ठाकरेंच्या पक्षाला हाताची साथ

Last Updated:

लोकसभा आणि विधानसभेत पवार काका-पुतणे ऐकमेकांच्या विरोधत लढले होते. रोहित पवारांनी तर काका अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना मलिदा गँग ही उपमा दिली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : राज्यातली महाविकास आघाडी आणि राज्यातली महायुती पुण्यात फुटलीय. दोन्ही पवार काका पुतण्यांना एकत्र आणण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड महापालिका कारणीभूत ठरलीय. तर काँग्रेस आणि उबाठाने वेगळी चूल मांडल्यानं लढत तिरंगी होणार आहे.
News18
News18
advertisement

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांनी मविआची साथ सोडून थेट अजित पवारांशी राजकीय हातमिळवणी केलीय. पुण्यात महाविकास आघाडी एकसंधपणे लढण्यासाठी पोषक वातवारण असल्याची चर्चा होती. पण पवार काका पुतण्यांनी आघाडी आणि महायुतीला धक्का देत नव्या आघाडीचा प्रयोग केला.

खरं तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत पवार काका-पुतणे ऐकमेकांच्या विरोधत लढले होते.

advertisement

रोहित पवारांनी तर काका अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना मलिदा गँग ही उपमा दिली होती.

पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसाठी आघाडीची घोषणा

आता पालिका निवडणुकीत हेच काका -पुतणे गळ्यात गळे घालून निवडणुकीला समोरं जाणार आहेत. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास जणू काही दोन्ही राष्ट्रवादीचं आधीचं सगळं काही ठरलं होतं. गेल्या आठवड्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली होती. पण त्यानंतर ती चर्चा फिस्कटल्याचं बोललं गेलं. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसशी बोलणी सुरु केली . पण ती बोलणी फारशी पुढे जावू शकली नाही आणि त्यानंतर थेट पवार काका पुतण्याच्या पक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसाठी आघाडीची घोषणा झाली.

advertisement

दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा रोहित पवारांनी फेटाळून लावली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले असली तरी या पक्षाचे उमेदवार घड्याळ की तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जुंपली होती.

advertisement

पक्ष चिन्हाच्या मुद्यावर रोहित पवार काय म्हणाले? 

पक्ष चिन्हाच्या मुद्यावर रोहित पवारांनी भूमिका स्पष्ट केलीय. विलीनीकरणाचा विषय असता तर राज्यभरात युती असती मात्र तसं काही होताना दिसत नाही हा स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पुण्यात महाविकास आघाडीला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मनसेला सोबत घेतल्यानं मुंबईत ठाकरेंच्या पक्षासोबतची युती तोडणाऱ्या काँग्रेस पुण्यात मात्र ठाकरेंच्या पक्षासोबतच निवडणूक लढवार आहे..पुणे महापालिकेसाठी ४५ जागा शिवसेना तर काँग्रेस ६० जागा लढवणार आहे.

advertisement

तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला विरोध करत काँग्रेसचा हात हातात घेणाऱ्या प्रशांत जगताप यांनी आज आपला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाढला सोयाबीनचा भाव, तूर आणि कापसाची स्थिती काय?
सर्व पहा

उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यात भाजप -शिवसेना विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरेंची आघाडी अशी तिरंगी लढणार आहे. निवडणुकीपूर्वी युती आणि आघाडीच्या चर्चांनी पुण्यात कधी नव्हे एवढी पुण्याच्या निवडणुकीची चर्चा रंगली. आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, महाविकास आघाडीत फूट; ठाकरेंच्या पक्षाला हाताची साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल