TRENDING:

पुण्यात मध्यरात्री थारचा थरार, मद्यधुंद चालकाने उडवली वाहनं, पोर्शे प्रकरणाची आठवण

Last Updated:

थार गाडीने चौकात थांबलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. एका रहिवासी इमारतीची संरक्षण भिंत तोडत चालकाने गाडी आत घुसवली. अपघात झाल्यावर गर्दीचा फायदा घेत चालकाने पळ काढला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील विमान नगर परिसरात मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास एका वाहन चालकाने धुमाकूळ घातला. भरधाव वेगात आलेल्या थारने चौकात थांबलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. पुण्यातील पोर्शे कारच्या अपघाताची चर्चा संपूर्ण देश झालेली असताना आता पुन्हा थार गाडीच्या पराक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे अपघात
पुणे अपघात
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार थार गाडीने चौकात थांबलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. एका रहिवासी इमारतीची संरक्षण भिंत तोडत चालकाने गाडी आत घुसवली. अपघात झाल्यावर गर्दीचा फायदा घेत चालकाने पळ काढला.

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु अपघात इतका भीषण होता की अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. पुण्यातील विमान नगर भागात असलेल्या सी सी डी चौकात हा सगळा प्रकार घडला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित चालक हा नशेत होता अशी प्राथमिक माहिती आहे. गाडीमध्ये एकूण २ जण होते. त्यातील एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली असून संबंधित वाहन चालकाचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात मध्यरात्री थारचा थरार, मद्यधुंद चालकाने उडवली वाहनं, पोर्शे प्रकरणाची आठवण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल