नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यातून एक मृतदेह वाहून जात असल्याचे काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. पाटाच्या पाण्यात मृतदेह पाहताच नागरिकांनी तातडीने याची माहिती भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडून मृतदेह बाहेर
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कालव्यातील मृतदेह पाण्याबाहेर काढला. प्राथमिक तपास आणि मृतदेहाजवळील पुराव्यांवरून ही महिला राधिका सुरेश सावंत असल्याची ओळख पटली आहे. मृत राधिका यांचे वय साधारण ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
घातपात की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू
राधिका सावंत यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांनी कालव्यात उडी मारून आत्महत्या केली की हा एखादा घातपाताचा प्रकार आहे, यादृष्टीने भोर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल. या घटनेमुळे चिखलगाव रावडी परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
