TRENDING:

Rahuri Election: भाजप नेते भेटल्यावर प्राजक्त तनपुरेंची तलवार म्यान, आता NCP कडून गोविंद मोकाटे रणांगणात, शेवटच्या क्षणी काय घडलं?

Last Updated:

Rahuri Bypoll Election: राहुरीच्या रणांगणातून प्राजक्त तनपुरे यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतल्याची चर्चा आहे. तनपुरे यांच्या जागी पक्षाने स्थानिक नेते गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुरी (अहिल्यानगर) : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट आला असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात लढण्याची तयारी केलेले राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांना भाजपचे वरिष्ठ नेते भेटल्यावर आणि त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधल्यानंतर तनपुरे यांनी आश्चर्यकारकरित्या निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. तनपुरे यांच्या जागी पक्षाने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. गोविंद मोकाटे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरिता भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने प्रयत्न केले. परंतु मतदारसंघातील जनतेचे मत लढण्याचे आहे, असे सांगून प्राजक्त तनपुरे यांनी सुरुवातीपासूनच वातावरण तापवले. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी अर्ज भरणार की नाही, याबाबत संभ्रम कायम ठेवला. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दोन तीन बैठका संपन्न होऊन त्यात तनपुरे यांचे नाव अंतिम केले. परंतु सोमवारी कर्डिले यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे यांची भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

advertisement

मोकाटे विरुद्ध कर्डिले अशी थेट लढत

तनपुरे यांच्या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या गोविंद मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अर्ज भरताना उपस्थित होते. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मोकाटे यांचा अर्ज भरताना तनपुरे गैरहजर होते. राहुरी मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांच्या भेटी घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र, ऐनवेळी प्राजक्ता तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता निवडणुकीतून माघार घेतली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता राहुरीत थेट लढत भाजपाचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांच्यात होणार आहे.

advertisement

तनपुरे यांना भाजपकडून मोठे आश्वासन, त्यामुळेच माघार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कडक उन्हाचा कांदा शेतीवर परिणाम, पिकाचे कसे कराल संरक्षण? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

भाजप नेते भेटल्यानंतर तनपुरे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्याविषयी विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. तनपुरे यांना भाजपकडून मोठे आश्वासन देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विनंती केल्यामुळे मी माघार घेतली, असे कारण तनपुरे यांनी दिले. या कारणावरून त्यांची भाजपसोबत असलेली जवळीक अधोरेखित होते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rahuri Election: भाजप नेते भेटल्यावर प्राजक्त तनपुरेंची तलवार म्यान, आता NCP कडून गोविंद मोकाटे रणांगणात, शेवटच्या क्षणी काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल