TRENDING:

भिल्ल समाजाचे नेते, आंबेडकरांचे विश्वासू, राहुरी पोटनिवडणुकीत अनिल जाधवांनाच उमेदवारी का? ही आहेत ४ कारणं

Last Updated:

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने अनिल जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक
advertisement

बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

कोण आहेत अनिल जाधव?

अनिल जाधव हे आदिवासी भिल्ल समाजातून उदयास आलेले एक लढाऊ आणि समर्पित नेतृत्व आहे. सध्या ते वंचित बहुजन आघाडीच्या एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असून उत्तर महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करत आहेत.

advertisement

वंचितने अनिल जाधव यांनाच उमेदवारी का दिली?

अनिल जाधव यांनी २०२४ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. तसेच, आता राहुरी पोटनिवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या राजकारणाचा गाभा हा संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास यावर आधारित आहे.

advertisement

हिंदू-मुस्लिम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. तसेच अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांसाठी ते ठाम आणि आक्रमक भूमिका मांडताना दिसतात.

इतर पक्षांकडून धर्म आणि जातीयतेच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जात असताना, अनिल जाधव हे संविधान आणि विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर उभे राहतात. अतिक्रमणग्रस्त नागरिकांच्या न्यायासाठी त्यांनी प्रभावी लढा देत त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कामामुळे त्यांना सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद आहे.

advertisement

बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून अनिल जाधव यांची ओळख 

बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळखली जाते. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी झटणारे एक निष्ठावान नेतृत्व म्हणून अनिल जाधव यांची ओळख निर्माण झाली आहे.

भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?
सर्व पहा

भारतीय जनता पक्षाने राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना तिकीट जाहीर होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिल्ल समाजाचे नेते, आंबेडकरांचे विश्वासू, राहुरी पोटनिवडणुकीत अनिल जाधवांनाच उमेदवारी का? ही आहेत ४ कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल