निकाल काय आला?
भाजप - 12
शिवसेना -16
राष्ट्रवादी काँग्रेस - 16
शिवसेना UBT - 5
काँग्रेस -1
शेकाप-0
इतर - 1
राजकीय पार्श्वभूमी, प्रतिष्ठेची लढत
रायगड हा पारंपरिकरित्या तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात मजबूत संघटन उभी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे भरत गोगावले यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रीपद भूषवल्यानंतर जिल्ह्यात आपली राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला होता. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरील नव्हती, तर दोन प्रभावी नेत्यांमधील शक्तिपरीक्षा ठरली.
advertisement
कोण कुणावर पडलं भारी?
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विविध गणांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढती पाहायला मिळाल्या. काही महत्त्वाच्या गणांमध्ये शिवसेनेने आघाडी घेत गोगावले यांच्या नेतृत्वाला बळ दिले, तर राष्ट्रवादीनेही आपला प्रभाव कायम राखत अनेक ठिकाणी विजय मिळवला.
पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची तुलनेने मजबूत कामगिरी दिसून येते, तर जिल्हा परिषद स्तरावर राष्ट्रवादीने आपली पकड सैल होऊ दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात आपली ताकद सिद्ध केली आहे.
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही तटकरे विरुद्ध गोगावले अशीच रंगली. अंतिम निकाल पाहता, ही लढत एकतर्फी नसून दोन्ही गटांनी आपली ताकद दाखवली आहे.
