TRENDING:

जमीन मोजणीचं काम आता झटपट होणार, सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

Last Updated:

Land Survey Decision: मोजणीची वाढती प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील जमीन मोजणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी सुपरफास्ट पद्धतीने होणार आहे. वाढत्या प्रलंबित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ही नवी कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दीर्घकाळ वाट पाहावी लागणारी जमीन मोजणी प्रक्रिया आता ठरलेल्या वेळेत पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. राज्यभरात जमीन मोजणीसाठी प्रलंबित असलेल्या हजारो अर्जांचा विचार करता ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खाजगी भूमापकांची नियुक्ती होणार

नव्या धोरणानुसार, प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित खाजगी भूमापकांची नियुक्ती केली जाणार आहे. या भूमापकांच्या मदतीने मोजणीची कामे ठरलेल्या दिवशीच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.

advertisement

ठराविक वेळेत मोजणी पूर्ण होणार

सध्या जमीन मोजणीसाठी अनेक नागरिकांना महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता ठराविक वेळेत मोजणी पूर्ण होणार असल्याने या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खाजगी भूमापकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि नियमावली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video
सर्व पहा

दरम्यान, खाजगी भूमापकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि नियमावली निश्चित करण्यात येणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक गतिमान होणार असून, प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जमीन मोजणीचं काम आता झटपट होणार, सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल