प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत जगतापांनी पक्ष सोडण्यामागं फार मोठं कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण हे कारण काय आहे, हे मी आताच सांगणार नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
advertisement
रोहित पवार नक्की काय म्हणाले?
प्रशांत जगताप यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल विचारलं असता रोहित पवार म्हणाले, "प्रशांत जगताप चांगले पदाधिकारी होते. पण त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला? कशामुळे घेतला? हे मी काही सांगणार नाही. त्याला वेगळी कारणं आहेत. फार मोठी कारणं आहेत. त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता. आम्ही एकत्रित काम केलं आहे. प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं घेत होते. त्यातील ९५ टक्के कार्यकर्ते सुप्रिया सुळेंना भेटले."
"त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी आपल्याला घड्याळासोबत जावं लागेल. त्यामुळे ही कार्यकर्त्यांची लढाई असल्याने कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा निर्णय घेण्यात आला. टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्र आले, ही बाब कितीही खरी असली तरी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि घड्याळाच्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी. महापालिकेत बलाढ्य शक्तीशी लढणं सोपं जावं, यासाठी हा निर्णय घेतला आहे," असंही रोहित पवार म्हणाले.
