Success Story : द्राक्ष शेती तोट्यात, शेतकऱ्यानं घेतला ॲपल बोर शेतीचा निर्णय, वर्षाला लाखात कमाई
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
द्राक्ष शेतीत नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्याने निवडलेल्या ॲपल बोराच्या शेतीचा मार्ग शाश्वत उत्पन्नाचा मार्ग बनला आहे.
जालना : पारंपरिक पिकांमधून मिळणारे अल्प उत्पन्न यामुळे शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहेत. जालन्यातील तरुण शेतकऱ्याने ॲपल बोरांची शेती यशस्वी केली आहे. यामाध्यमातून दोन एकरात 5 ते 6 लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. द्राक्ष शेतीत नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्याने निवडलेल्या ॲपल बोराच्या शेतीचा मार्ग शाश्वत उत्पन्नाचा मार्ग बनला आहे.
जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील तरुण शेतकरी भागवत दराडे यांच्याकडे तब्बल 8 एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग होती. परंतु, कोरोना काळानंतर तीन ते चार वर्ष द्राक्ष शेती तोट्यात गेली. अनेक शेतकरी यातून सावरू शकले नाहीत. परंतु, मोठं आर्थिक नुकसान होऊनही खचून न जाता दराडे यांनी ॲपल बोर शेतीचा पर्याय निवडला. कमी खर्च आणि अधिकचे उत्पन्न यामुळे ही शेती फायदेशीर ठरू लागली. त्यामुळे आता त्यांच्याकडे तब्बल 6 एकरवर ॲपल बोराची शेती आहे. यातून त्यांना 10 ते 12 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते.
advertisement
ॲपल बोराच्या शेतीमधील छाटणीनंतर वाया जाणारे वेस्टेज ते आपल्या शेळ्यांना खायला देतात. लाकडापासून कोळसा तयार होतो. त्याची देखील शेतावरच विक्री होते. वेस्टेज मटेरियल विक्रीतून बागेवर होणारा खर्च निघत असल्याने शेतीतून मिळणारे सर्व उत्पन्न नफा म्हणून शिल्लक राहते.
advertisement
माझं बीएससी ॲग्री शिक्षण झालं आहे. जालना शहरातील एका सीड्स कंपनीत नोकरी देखील केली. परंतु, कमी पगाराची नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याचा मार्ग निवडला. सध्या सुरू असलेल्या 2 एकरच्या प्लॉटमधून 5 ते 6 लाख रुपये होतील. बाजारात या बोरांना 50 ते 60 रुपये किलो असा दर मिळत असल्याचे दराडे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : द्राक्ष शेती तोट्यात, शेतकऱ्यानं घेतला ॲपल बोर शेतीचा निर्णय, वर्षाला लाखात कमाई








