Pune Air : पुणेकरांनो जरा जपूनच बाहेर पडा! हिंजवडी, वाकडमधील हवेत घोंघावतय 'हे' संकट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वाकड परिसरातील स्थिती अधिकच भीषण आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता येथील हवेतील घातक सूक्ष्म धूलिकणांचे (PM 2.5) प्रमाण ३०७ नोंदवण्यात आले, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवेचा दर्जा कमालीचा खालावला आहे. विशेषतः हिंजवडी आणि वाकड पट्ट्यातील हवा आता 'अतिखराब' श्रेणीत पोहोचली आहे. भूमकर चौक आणि परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३०० च्या पार गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण शहराचा सरासरी निर्देशांक सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी २२० असलेला हा आकडा रविवारी २३२ वर पोहोचला. मात्र, वाकड परिसरातील स्थिती अधिकच भीषण आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता येथील हवेतील घातक सूक्ष्म धूलिकणांचे (PM 2.5) प्रमाण ३०७ नोंदवण्यात आले, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
advertisement
प्रदूषणामागची प्रमुख कारणे: 1. अनियंत्रित बांधकामे: हिंजवडी आणि वाकड परिसरात सुरू असलेले गृहप्रकल्प आणि व्यापारी बांधकामांमुळे हवेत धुळीचे लोट पसरत आहेत. 2. रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लॅन्ट: या भागात मोठ्या संख्येने कार्यरत असलेले काँक्रीट प्रकल्प प्रदूषणात मोठी भर घालत आहेत. 3. वाहतूक कोंडी: आयटी पार्क आणि लगतच्या महामार्गावरील वाहनांच्या धुरामुळे नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाणही वाढत आहे.
advertisement
हवेची गुणवत्ता 'अतिखराब' स्तरावर पोहोचल्यामुळे केवळ लहान मुले किंवा वृद्धांनाच नाही, तर निरोगी व्यक्तींनाही श्वसनाचे त्रास, खोकला आणि डोळ्यांची जळजळ अशा समस्या जाणवू शकतात. या हवेत दीर्घकाळ राहिल्यास फुफ्फुसांचे गंभीर विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Air : पुणेकरांनो जरा जपूनच बाहेर पडा! हिंजवडी, वाकडमधील हवेत घोंघावतय 'हे' संकट









