कारागिरावर विश्वास ठेवणं भोवलं; दागिने घडवायला दिले, पण..., पुण्यातील सराफा व्यावसायिकाला धक्काच बसला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील रविवार पेठ ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. येथील एका सराफा व्यावसायिकाकडे शिवलाल लोहार हा कारागीर म्हणून कामाला होता
पुणे : सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात पुण्यातील गजबजलेल्या रविवार पेठ परिसरात एका सराफा व्यावसायिकाच्या विश्वासाला तडा गेल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्याकडेच काम करणाऱ्या एका कारागिराने सोन्या-चांदीच्या कामाचा हातखंडा वापरण्याऐवजी चक्क १ लाख ४० हजार रुपये किमतीचे चांदीचे मुखवटे चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूर येथील रहिवासी असलेल्या कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील रविवार पेठ ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. येथील एका सराफा व्यावसायिकाकडे शिवलाल लोहार (वय ३४) हा कारागीर म्हणून कामाला होता. तक्रारदार व्यावसायिक चांदीचे विविध देवदेवतांचे मुखवटे घडवण्याचे काम करतात. त्यांनी विश्वासाने हे काम आपल्या कारागिराकडे दिलं होतं. मात्र, शिवलालने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली आणि चांदीचे दोन मौल्यवान मुखवटे चोरले. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
मिळालेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी शिवलाल लोहार याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून, तो आपल्या गावी (राजस्थान) पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस हवालदार हर्षल दुडम या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कारागिरावर विश्वास ठेवणं भोवलं; दागिने घडवायला दिले, पण..., पुण्यातील सराफा व्यावसायिकाला धक्काच बसला










