Success Story: 20 गुंठ्यात झेंडूची शेती, नागपूरसह मुंबईतही विक्री; पारंपरिक शेती निवडत महिन्याकाठी भरघोस कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथील शेतकरी प्रभाकर जाधव 2002 पासून फुल शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील वाणेगाव येथील शेतकरी प्रभाकर जाधव 2002 पासून फुल शेती करत आहे. 20 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. नागपूर, मुंबई, पुणे यासह विविध ठिकाणी जाधव यांचा झेंडू पार्सल द्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुल शेतीच्या माध्यमातून प्रभाकर जाधव यांना यंदा जवळपास 3 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच झेंडू शेतीतून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, ही शेती कशा पद्धतीने करावी, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
वाणेगाव येथे प्रभाकर जाधव यांची वडिलोपार्जित मका आणि कापसाची शेती होती. मात्र काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने त्यांनी गेल्या 23 वर्षांपासून झेंडू शेतीला सुरुवात केली. यंदा देखील 25 ऑगस्ट रोजी झेंडूची लागवड केली, मल्चिंगवर बेड पद्धतीने झेंडूची लागवड करण्यात आली आहे. चार बाय एक फुटावर या झेंडू झाडांची लागवड जाधव यांनी केली आहे. तसेच या शेतीसाठी ट्रीप द्वारे पाण्याचे व्यवस्थापन केलेले आहे. तसेच तापमान वाढल्यास फोबरने वरतून पाणी दिले की ते तापमान स्थिर व झाडांना पोषक ठेवते. याबरोबरच गतवर्षी 35 टनापर्यंत झेंडूचे उत्पादन निघाले होते असे प्रभाकर जाधव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
झेंडू शेतीतील यंदा सध्या चौथा तोडा सुरू आहे, आतापर्यंत पंधरा क्विंटल फुलं निघाले आहे. या तोड्यातील 10 क्विंटल झेंडू नागपूरसाठी काढला असून तो 50 रुपये किलोने जागेवरून पार्सल देखील केला आहे. झेंडू टिकून ठेवण्यासाठी चांगले उत्पादन मिळवण्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक होळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरावी लागते. लागवड केल्यानंतर त्या वेळेला 3 फवारण्या केल्या होत्या, पहिल्या वेळेस मायको दुसऱ्या वेळेस 13-40-13 आणि तिसरी 12-61 या औषधांच्या फवारण्या केल्या आहे, झेंडू फुल शेती फायदेशीर आहे, तसेच तरुणांनी या शेतीमध्ये उतरायला हवे, असे देखील जाधव यांनी म्हटले आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 8:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: 20 गुंठ्यात झेंडूची शेती, नागपूरसह मुंबईतही विक्री; पारंपरिक शेती निवडत महिन्याकाठी भरघोस कमाई










