TRENDING:

"दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही", सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवारांचं परखड मत

Last Updated:

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजित पवारांच्या अकाली निधनाचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. यातून आता पवार कुटुंबासह महाराष्ट्र हळूहळू सावरत आहे. अजित दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या ७२ तासांत अशाप्रकारे शपथविधी झाल्याने सुनेत्रा पवारांवर काहींनी टीका केली. शपथविधी घ्यायला इतकी घाई का केली? किमान १३ दिवस थांबायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया जनतेतून समोर आली. तर काहींनी सुनेत्रा पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
News18
News18
advertisement

आता या सगळ्या घडामोडीवर शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण सुनेत्रा काकींमध्ये आम्ही अजित दादांना पाहतो, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. आज बारामतीसह संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान घेतलं जात आहे. रोहित पवारांनीही बारामतीत मतदान केलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद आणि सुनेत्रा पवारांचा शपथविधी यावर सविस्तर भाष्य केलं.

advertisement

मागील काही दिवसांत पवार कुटुंबीयांच्या झालेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबत पवार कुटुंबात काही चर्चा झाली आहे का? असा सवाल विचारला असता रोहित पवार म्हणाले, "याबाबत काहीही चर्चा झाली नाही. जेव्हा ही दु:खद घटना घडली. तेव्हा काही दिवस आम्हाला काहीही सुचत नव्हतं. आमच्या डोक्यात कुठलाही राजकीय विचार येत नव्हता. पण मनात एक मात्र होतं की अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण सुनेत्राकाकींकडे बघत असताना, त्या एक परिवाराचा भाग म्हणून सुनेत्रा काकींमध्ये मी अजित काकांना बघतो."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

"त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं आणि अजित दादांकडील सर्व खाती त्यांना मिळावीत, अशी मनोमन इच्छा होती. तसेच त्या पक्षात अजित दादांची जी पोझीशन होती, म्हणजे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते, हे पदही सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे, अशी देखील इच्छा माझ्या मनात आहे," असंही रोहित पवार म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही", सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवारांचं परखड मत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल