TRENDING:

शरद पवार गटाला अल्टीमेटम, जर युती झाली नाही ३ प्लॅनही ठरले, सचिन अहिरांची घोषणा

Last Updated:

शरद पवार गटाची अनुपस्थिती पाहून ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे शरद पवार गटाने पाठ फिरवल्याने मविआत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी यावर आक्रमक पवित्रा घेत शरद पवार गटाला थेट 'अल्टीमेटम' दिला असून, तीन पर्यायी प्लॅनही जाहीर केले आहेत.
महाविकास आघाडी चर्चा
महाविकास आघाडी चर्चा
advertisement

पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यात महाविकास आघाडीला साथ दिलीय, तर पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्यावरून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून तीन सकारात्मक बैठका सुद्धा झाल्या आहेत, दोन्ही पक्षाचे नेते यासाठी अनुकूल सुद्धा आहेत.

advertisement

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा, मविआमध्ये अस्वस्थता

शहरामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही बोलणी करत आहे. तर दुसरीकडे शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशीशीही चर्चा करत आहे, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे मविआमध्ये अस्वस्थता असून, त्याचेच पडसाद या बैठकीत उमटल्याचे पाहायला मिळाले.

advertisement

शरद पवार गटाची अनुपस्थिती पाहून ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी शरद पवार गटाची वाट न पाहता महाविकास आघाडीचे 'तीन' पर्यायी प्लॅन तयार असल्याचे जाहीर करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सचिन अहिर यांचे ३ पर्यायी प्लॅन कोणते ?

प्लॅन 'A': शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार.

advertisement

प्लॅन 'B': शरद पवार गट सोबत न आल्यास, उर्वरित मित्रपक्ष एकत्र मिळून मैदानात उतरणार.

प्लॅन 'C': ठाकरे सेना आणि मनसे यांच्या युतीचा नवा पर्याय!

सचिन अहीर यांनी केवळ प्लॅनच जाहीर केले नाहीत, तर शरद पवार गटाला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. आम्ही कोणासाठी थांबणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये नवी समीकरणं जुळण्याची शक्यता

तिकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना शिंदे गट सुरवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन जाण्यास तयार होता, मात्र वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी झालेल्या चर्चेतून भाजपसोबत जाण्याचा निर्धार करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोंडीत पकडलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

पिंपरी-चिंचवडमध्ये नवी समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शरद पवार गट यावर काय भूमिका घेतो आणि मविआचे हे संकेत खरोखरच अंमलात येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवार गटाला अल्टीमेटम, जर युती झाली नाही ३ प्लॅनही ठरले, सचिन अहिरांची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल