TRENDING:

अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक का होत नाही? फडणवीस, ठाकरे, शिंदेंनी एकच उत्तर दिलं : संभाजीराजे

Last Updated:

चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया असं म्हणत संभाजीराजेंनी सरकार विरोधात पहिली मोहीम सुरु केली आहे. पुण्यातून व राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रमोद पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

नवी मुंबई :  आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती ऍक्शन मोड मध्ये आलेत. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे. डिसेंबर 2016 रोजी भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होणार आहेत पण महाराजांचे स्मारक काही दिसेना. हाच मुद्दा पकडून संभाजीराजे छत्रपती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय.

advertisement

चला, अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया असं म्हणत संभाजीराजेंनी सरकार विरोधात पहिली मोहीम सुरु केली आहे. पुण्यातून व राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. चारशे गाड्यांचा ताफा घेऊन छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. ही दडपशाही आमच्यावरच का असा प्रश्न छत्रपती संभाजी राजेंनी विचारला. मुंबईतील अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक शोधणार आहे. मी पाच वर्ष खासदार होतो,त्या वेळी ही पाठपुरावा केला होता.  उध्दव ठाकरेंना सुध्दा माझा सवाल आहे की काय झाले? ही माझी राजकीय भूमिका नाही. गडकोट किल्याची वाईट अवस्था आहे. माझा कुणालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाही असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

advertisement

फडणवीस, ठाकरे, शिंदेंना विचारणा केली; एकच उत्तर आलं

संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्य पक्षाची नुकतीच नोंदणी झालीय. प्रतिकात्मक आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे. गडकोट संवर्धनासाठी मी १५ वर्षांपासून प्रयत्न करतोय. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन झालं तेव्हा मी तिथे हजर होतो. मोदींचं कौतुक केलं. वेळोवेळो मी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्याकडेही विचारणा केली. त्यांचं एकच उत्तर आलं आणि ते म्हणजे प्रकरण कोर्टात अडकलंय.

advertisement

मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्तरावरून संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, तुम्ही पंतप्रधानांना बोलावता, त्यावेळी सर्व परवानग्या असल्याशिवाय त्यांना बोलावणं चुकीचं आहे. पुढे निवडणुका होत्या म्हणून घाई गडबडीने जलपूजन करून घेतलंत का? आता तुम्ही मला निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करताय असा आरोप करताय पण तुम्ही काय करताय मग?

उद्धव ठाकरेंनीही सांगावं काय केलं?

advertisement

मी पक्ष होण्याआधीपासूनही पाठपुरावा केलाय. मी राज्यसभा खासदार असतानाही पत्रव्यवहार केलाय. फडणवीस, ठाकरे, शिंदेंशी बोलणं झालंय वेळोवेळी. पूर्वाश्रमीचे नेतेही होते. सर्वांनाच विचारलंय. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं हे सांगावं. सुशिलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण असताना घोषणा केल्या होत्या. त्यांनी पुढे काय नेलं नाही म्हणून भाजपने जाहिरनाम्यात घेतलं आणि २०१६ ला पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांनी जलपूजन केलं.

काय खर्च झाले आणि कुठे झाले?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

माझं कौतुक नाही सांगत पण मी रायगडच्या मागे लागलो आणि प्राधिकरण स्थापन होऊन तिथं काम सुरूय. ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने साडे चारशे कोटी देणार असं म्हटलं होतं. काय खर्च झाले, कुठे खर्च झाला हा प्रश्न आहे. डीपीसीच्या ३ टक्के निधी कुठल्या गड आणि स्मारकासाठी खर्च केला दाखवा मला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक का होत नाही? फडणवीस, ठाकरे, शिंदेंनी एकच उत्तर दिलं : संभाजीराजे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल