TRENDING:

जत जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : जतमधील विजयी उमेदवारांची यादी, कुणी मारली बाजी?

Last Updated:

Sangli Jat ZP election result 2026 : जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 9 गट असून, तिथली भौगोलिक परिस्थिती आणि प्रलंबित पाणी प्रश्नामुळे या निवडणुका नेहमीच चुरशीच्या ठरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Jat ZP election result 2026 : जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 9 गट असून, तिथली भौगोलिक परिस्थिती आणि प्रलंबित पाणी प्रश्नामुळे या निवडणुका नेहमीच चुरशीच्या ठरतात. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानानंतर, आजच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, जतच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार हे काही वेळातच स्पष्ट होईल.
Sangli Jat ZP election result 2026
Sangli Jat ZP election result 2026
advertisement

जत तालुक्यात पाणी हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला असून, यंदाही प्रचारामध्ये म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाचा विषय केंद्रस्थानी होता. आमदार पडळकर यांनी जतच्या विकासासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आहेत, तर महाविकास आघाडीने भाजपच्या मागील काळातील अपयशावर बोट ठेवले आहे. या दोन परस्परविरोधी विचारसरणींपैकी जतची जनता कोणाच्या पारड्यात आपले माप टाकते, हे आता लवकरच समोर येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

आजच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने जतमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. तालुक्यातील 9 गटांत झालेल्या मतदानाचा कौल पाहता, अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज जतच्या मिनी मंत्रालयाचा नवा कारभारी कोण असेल, याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल आणि विजयाचा गुलाल कोणाच्या वाट्याला येतो, हे समजेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
जत जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : जतमधील विजयी उमेदवारांची यादी, कुणी मारली बाजी?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल