TRENDING:

कडेगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील विजयी उमेदवार कोण? पाहा संपूर्ण यादी

Last Updated:

Sangli Kadegoan ZP election result 2026 : कडेगावचा हा निकाल केवळ तालुक्यापुरता मर्यादित नसून, जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणात भाजप आपली पकड कायम ठेवणार की काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारणार, हे आता लवकरच समोर येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Kadegoan ZP Election Result 2026: कडेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सध्या मोठे राजकीय रणकंदन पाहायला मिळत आहे. या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 4 गट असून, येथे प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांच्यात पारंपारिक आणि अत्यंत चुरशीची लढत होत आहे. आज म्हणजेच 9 फेब्रुवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून, कडेगावच्या मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Sangli Kadegoan ZP election result 2026
Sangli Kadegoan ZP election result 2026
advertisement

या निवडणुकीत हिंगणगाव बुद्रुक गणातील लढत सर्वात जास्त लक्षवेधी ठरली आहे. येथे काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातू डॉ. जितेश हणमंतराव कदम मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपने प्रा. आशिष जयसिंग घार्गे यांना उमेदवारी दिली आहे. या दोन युवा नेत्यांमधील संघर्षाने तालुक्यात मोठी रंगत आणली असून, तरुण मतदारांचा कौल कोणाकडे जातो, यावर निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

advertisement

हेही वाचा: सांगली कडेगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई–पुणे प्रवास होणार सुसाट, मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला
सर्व पहा

आज सकाळी 10 वाजल्यापासून कडेगाव येथे मतमोजणीला सुरुवात झाली असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व 4 गटांचे आणि 8 गणांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. कडेगावचा हा निकाल केवळ तालुक्यापुरता मर्यादित नसून, जिल्ह्याच्या सत्तेच्या समीकरणात भाजप आपली पकड कायम ठेवणार की काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारणार, हे आता लवकरच समोर येईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
कडेगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील विजयी उमेदवार कोण? पाहा संपूर्ण यादी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल