TRENDING:

कवठेमहांकाळ जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : कवठेमहांकाळात सत्ता कुणाची? रोहित पाटलांच्या 4 गटात कुणी मारली बाजी!

Last Updated:

Sangli kavathe mahankal ZP election result 2026 : आमदार रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी एकत्र येत मोठी फळी उभारली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli kavathe mahankal ZP election result 2026 : यावेळच्या निवडणुकीत कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध सर्वपक्षीय महायुती असा प्रखर सामना पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पाटील यांच्या विरोधात माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी एकत्र येत मोठी फळी उभारली आहे. या 'सर्वपक्षीय' विरोधाला रोहित पाटील कसे तोंड देतात, यावर त्यांचे तालुक्यातील राजकीय भविष्य अवलंबून आहे.
Sangli kavathe mahankal ZP election result
Sangli kavathe mahankal ZP election result
advertisement

ढालगाव गटात अत्यंत चुरशीची लढत होत असून, तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास हाक्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रावसाहेब पाटील आमनेसामने आहेत. दोन राष्ट्रवादीमधील या थेट संघर्षात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा गट कोणाच्या खिशात जातो, यावर जिल्हा परिषदेतील सत्तेचे पारडे झुकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तालुक्यात झालेल्या सरासरी 68 टक्के मतदानामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची धाकधूक उमेदवारांमध्ये वाढली आहे. रोहित पाटील आपला 'गड' राखण्यात यशस्वी होतात की महायुती सत्तांतर घडवते, याचा फैसला आता काही क्षणांतच होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
कवठेमहांकाळ जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : कवठेमहांकाळात सत्ता कुणाची? रोहित पाटलांच्या 4 गटात कुणी मारली बाजी!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल