TRENDING:

तासगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : तासगावात चित्र काय? 6 गटात कुणी कुणी गुलाल उधळला? पाटलांचं काय?

Last Updated:

Sangli Tasgoan ZP election result 2026 : यंदाच्या निवडणुकीत रोहित पाटील आणि संजय पाटील या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये थेट लढत झाली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (घड्याळ चिन्ह) समोरासमोर उभे ठाकले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sangli Tasgoan ZP election result 2026 : तासगाव तालुक्याच्या राजकारणात आर. आर. आबांच्या पश्चात आमदार रोहित पाटील यांनी आपली पकड मजबूत केली होती. मात्र, अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत संजय पाटील यांच्या 'स्वाभिमानी विकास आघाडी'ने रोहित पाटील यांच्या गटाला धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रोहित पाटील आपला बालेकिल्ला राखणार की संजय पाटील पुन्हा बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं.
Sangli, Tasgoan ZP  election result 2026
Sangli, Tasgoan ZP election result 2026
advertisement

यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये थेट लढत झाली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (घड्याळ चिन्ह) समोरासमोर उभे ठाकले होते. रोहित पाटील यांनी गावोगावी बैठका घेऊन संघटना मजबूत केली असली, तरी संजय पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेची शक्ती एकत्रित केली आहे. या दोन 'शक्तिपीठां'मधील संघर्षामुळे प्रत्येक गटात विजयाचे गणित लावणे कठीण झालं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुढील 24 तास महत्त्वाचे, कल्याण-डोंबिवलीवर दुहेरी संकट, IMD नं दिला अलर्ट
सर्व पहा

आजच्या मतमोजणीनंतर तासगाव तालुक्याच्या मिनी मंत्रालयाची चावी कोणाकडे जाणार, याचा फैसला होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. ही निवडणूक केवळ स्थानिक नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
तासगाव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : तासगावात चित्र काय? 6 गटात कुणी कुणी गुलाल उधळला? पाटलांचं काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल