येथे प्रामुख्याने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट आणि रयत क्रांती संघटना अशी लढत होत होती. या संघर्षात कोण बाजी मारणार, यावर सांगलीच्या सत्तेचे गणित अवलंबून होतं. अशातच आता जयंत पाटलांचा करिष्मा पुन्हा पहायला मिळाला.
येलूर जिल्हा परिषदेत भाजपाचा जलवा
वाळव्यातून एका जागेवर जयंत पाटील यांना धक्का बसला. येलूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या हर्षदा राहुल महाडीक विजयी झाल्या आहेत. त्यांनी देविका भोजराज राजेघोरपडे यांचा पराभव केलाय. पण वाळव्यात जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 07 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
advertisement
वाळव्यातील मोठ्या लढती
| जिल्हा परिषद गट | महाविकास आघाडी / इतर | महायुती / इतर | विजयी उमेदवार | |
| चिकुर्डे | अभिजित पाटील (शिवसेना उबाठा) | Vs | अशोक पाटील (BJP) | अभिजीत पाटील |
| वाटेगाव | संध्या आनंदराव पाटील (राष्ट्रवादी श.प.) | Vs | ज्योती अमोल पाटील (BJP) | |
| येलूर | देविका भोजराज राजेघोरपडे (राष्ट्रवादी श.प.) | Vs | हर्षदा राहुल महाडिक (BJP) | हर्षदा राहुल महाडिक |
| कामेरी | रणजित पाटील (राष्ट्रवादी श.प.) | Vs | जयराज पाटील (BJP) | |
| बोरगाव | जयश्री जितेंद्र पाटील (काँग्रेस) | Vs | कांता शिवाजी वाटेगावकर (राष्ट्रवादी श.प.) | |
| बागणी | उर्मिला संतोष घनवट (राष्ट्रवादी श.प.) | Vs | मोहिनी सागर खोत (रयत क्रांती) | मोहिनी सागर खोत |
दरम्यान, कामेरी गटात तर एकेकाळचे मित्र आता एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जयराज पाटील आणि माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यातील ही लढाई पूर्णपणे व्यक्तिगत प्रतिष्ठेची बनली. वाळवा तालुक्यातील 11 गट आणि 22 गणांचा निकालावर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे राजकीय भविष्य ठरलं आहे.
