TRENDING:

सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा ड्रामा! सभापती निवडीसाठी कडेकोट बंदोबस्त; कुणाचं वर्चस्व राहणार?

Last Updated:

सातारा जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीत राष्ट्रवादी व शिवसेनेचा बहिष्कार, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून 100 मीटर परिसरात जमावबंदी, भाजप सभापती बिनविरोध.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार, याचा फैसला आज होणाऱ्या विषय समिती सभापतींच्या निवडीने स्पष्ट होणार आहे. मात्र, या निवडीपूर्वीच जिल्हा परिषद परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून १०० मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की पाहता, आज जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे.
सातारा
सातारा
advertisement

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांची अबूतपूर्व घोषणाबाजी काळ्याफिती बांधून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेमध्ये दाखल प्रशासनाचा निषेध करताना या ठिकाणी सदस्य पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बहिष्कार घातल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे सदस्य भाजपने फोडल्याचे कारण देत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नसल्याचा आरोप करत बहिष्कार टाकण्यात आला. या बहिष्कारामुळे भाजपचे सर्व सभापती बिनविरोध निवडून येणार आहेत.

advertisement

सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीची निवड आज होत आहे. यामुळे या निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडी वेळी वातावरण तणावग्रस्त झालं होतं. हा प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

काही दिवसांपूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी जिल्हा परिषदेत मोठा राडा झाला होता. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याने राज्याचे राजकारण तापले होते. तो प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः लक्ष घातले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रशासनावर होणारे आरोप टाळण्यासाठी प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

साताऱ्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते. आजच्या या निवडीत कोण बाजी मारणार? भाजप आपला गड राखणार की महायुतीमधील इतर घटक पक्ष वरचढ ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे. राजकीय वर्तुळात सध्या विविध नावांची चर्चा रंगली असून, थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा ड्रामा! सभापती निवडीसाठी कडेकोट बंदोबस्त; कुणाचं वर्चस्व राहणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल