नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शनावरून परतत असताना हा हल्ला झाला.
मारहाण झालेल्या बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर इनोव्हा गाडीतून आले होते. त्यांनी गाडी अडवून चोरेकर यांना मारहाण केली. पाल जिल्हा परिषद गटातील वर्चस्वावरून हा वाद झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात नेत्यांची धाव
या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
उद्या या गटासाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच झालेल्या या मारहाणीमुळे पाल गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याप्रकरणी आता उंब्रज पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
