TRENDING:

Shirdi: तहान भागवताना विजेचा करंट ठरला जीवघेणा, पाणी भरताना महिलेचा शॉक लागून कोळसा

Last Updated:

Shirdi News: लक्ष्मीनगरमध्ये ज्योती प्रकाश त्रिभुवन यांचा इलेक्ट्रिक मोटारचा करंट लागून मृत्यू, त्रिभुवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर; परिसरात हळहळ, घरगुती विद्युत उपकरणांवरील खबरदारी महत्त्वाची.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिश दिमोटे, प्रतिनिधी कोपरगाव: घरात स्वयंपाक असो, पिण्यासाठी पाणी असो किंवा रोजच्या वापरासाठी लागणारं पाणी असो, पाणी भरताना अचानक महिलेचा मृत्यू झाला आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय कोपरगावात आला. घरातील दैनंदिन कामं करत असताना, कुटुंबाची तहान भागवण्यासाठी पाणी भरताना एका माऊलीला काळाने गाठले.
News18
News18
advertisement

लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या ज्योती प्रकाश त्रिभुवन (वय ५०) या महिलेचा इलेक्ट्रिक मोटारचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्रिभुवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळी घरात पाणी आलं. घरातील इतर कामं उरकून ज्योतीताई पाणी भरण्यासाठी गेल्या. पाण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार सुरू करत असतानाच, अचानक विजेचा जोरदार प्रवाह त्यांच्या शरीरातून गेला.

advertisement

विजेचा धक्का इतका भीषण होता की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्योतीताई जागीच कोसळल्याचे पाहून शेजारील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दवाखान्यात उपचारासाठी नेण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्या हातांनी आयुष्यभर संसाराचा गाडा ओढला, मुलाबाळांची तहान भागवली, त्याच हातांना आज विजेचा विळखा बसला. "पाणी भरून येते" असे म्हणून गेलेली ही माऊली आता कधीच परतणार नाही, या विचाराने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. एका सामान्य घरगुती कामात अशा प्रकारे प्राणांतिक संकट ओढवेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

या घटनेने घरगुती विद्युत उपकरणे वापरताना किती खबरदारी घेणे आवश्यक आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ज्योतीताईंच्या जाण्याने लक्ष्मीनगर परिसरातील एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हरपला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi: तहान भागवताना विजेचा करंट ठरला जीवघेणा, पाणी भरताना महिलेचा शॉक लागून कोळसा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल