TRENDING:

जेव्हा कट्टर राजकीय वैरी एकमेकांना भेटतात, संजय राऊतांनी गुलाबरावांच्या खांद्यावर हात ठेवला!

Last Updated:

जळगावातील एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना नमस्कार करून विचारपूस केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून कमालीचा संघर्ष झाला. राजकीय रणांगणात एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यानच्या काळात दोन्ही गटातील नेते एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. परंतु पक्षफुटीची धग आता काहीशी शांत झाली आहे. जळगावात कट्टर राजकीय वैरी खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील एकमेकांना भेटले, स्मितहास्य केले, हस्तांदोलन केले! त्यांच्या भेटीचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दुरावलेले मित्र जेव्हा एकत्र येतात... अशा भावना लोक फोटो पाहून व्यक्त करीत आहेत.
संजय राऊत-गुलाबराव पाटील
संजय राऊत-गुलाबराव पाटील
advertisement

जळगावच्या धरणगाव येथे शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली. दोघेही पहिल्या रांगतेच स्थानापन्न झाले होते. यावेळी लग्नस्थळी दोघांमध्ये संवाद झाला.

संजय राऊतांनी गुलाबरावांच्या खांद्यावर हात ठेवला!

संजय राऊत यांनी विवाह सोहळ्यात प्रवेश केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांना नमस्कार केला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही संजय राऊत यांना नमस्कार करून त्यांची विचारपूस केली.

advertisement

दोघेजण एकाच रांगेत बसलेले होते परंतु काही वेळ त्यांनी एकमेकांकडे बघण्याचे टाळले.

तथापि वधू-वरास शुभेच्छा देऊन संजय राऊत परत येत असताना मंत्री गुलाबराव पाटील वधू-वरांस शुभेच्छा देण्यासाठी जात असताना दोघांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. दोन्ही नेत्यांचे हे फोटो समाज माध्यमांवर वेगाने फिरत आहेत.

advertisement

संजय राऊत-गुलाबराव पाटील यांची मैत्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

संजय राऊत आणि गुलाबराव पाटील हे दोन्ही नेते फर्डे वक्ते. आपल्या नेत्यांची कड घेऊन, भाषणे ठोकून सभा जिंकण्याचे काम गेली अनेक वर्षे दोघेही करीत आले. राऊत-गुलाबराव तसे उत्तम मित्र. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर दोघांच्या मैत्रीत अंतर पडले. दोघांच्याही राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. ठाकरेंसाठी दोघेही तावातावाने बोलणारे नेते एकमेकांवरच प्रहार करू लागले, दोघांमध्येच 'सामना' रंगू लागला. राऊत हे गुलाबरावांना उद्देशून गद्दार म्हणू लागले तर गुलाबराव राऊतांना एकेरी संबोधने करू लागले. परंतु जळगावातील लग्न समारंभाच्या निमित्ताने मागचे सगळे विसरून दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांची विचारपूस केली हे विशेष.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जेव्हा कट्टर राजकीय वैरी एकमेकांना भेटतात, संजय राऊतांनी गुलाबरावांच्या खांद्यावर हात ठेवला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल