TRENDING:

Dasara Melava : मुंबईचे डबेवाले परंपरा मोडणार, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला गैरहजर राहणार, कारण...

Last Updated:

Shivsena Dasara Melava : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मंगळवारी शिवाजी पार्कवर होणार आहे, पण या दसरा मेळाव्याला मुंबईचे डबेवाले उपस्थित राहणार नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 23 ऑक्टोबर : शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मंगळवारी शिवाजी पार्कवर होणार आहे, यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईत येण्यासाठी निघाले आहेत, पण मुंबईचे डबेवाले अनेक वर्षांची परंपरा मोडणार आहेत. मुंबईचे डबेवाले उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सहभागी होणार नाहीत. डबेवाला संघटनेने यामागचं कारणही सांगितलं आहे.
मुंबईचे डबेवाले ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सहभागी होणार नाहीत
मुंबईचे डबेवाले ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सहभागी होणार नाहीत
advertisement

'आम्ही बहुतांश डबेवाले आणि डबेवाल्यांचे कुटुंबिय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहिलो आणि यापुढेही राहू. पण मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी पाहता आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम पाहता यावर्षी डबेवाला शिवतिर्थावर दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही,' असं मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.

'पहिले मराठा आरक्षण मग नंतर पक्ष, अशी आमची भूमिका आहे. मराठा आरक्षण हा आमच्या मराठा जातीचा लढा आहे आणि तो लढा आम्हाला लढावा लागणार आहे. सध्या या लढ्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत,' असं सुभाष तळेकर म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळी सुट्ट्यांत फिरायला जाण्यासाठी खरेदी करा बॅग्स, किंमत 50 रुपयांपासून, हे ठिकाण माहितीये?
सर्व पहा

'आम्हाला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य असल्यामुळे आम्ही शिवतिर्थावरच्या दसरा मेळाव्याला वाजत गाजत गुलाल उधळत जात होतो. मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, पण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. पहिले मराठा आरक्षण मग पक्ष ही आमची भूमिका राहणार आहे. जरांगे पाटील यांच्या लढ्याला शक्य तितकं बळ देण्याचा आमचा प्रयत्न राहील,' अशी प्रतिक्रिया सुभाष तळेकर यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dasara Melava : मुंबईचे डबेवाले परंपरा मोडणार, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला गैरहजर राहणार, कारण...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल