वॉर्ड क्रमांक ९५ वरून जुंपली
मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून हा सर्व राडा झाला. अनिल परब यांनी या जागेसाठी त्यांचे खंदे समर्थक शेखर वैंगणकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, ऐनवेळी वैंगणकर यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली.
advertisement
अनिल परब संतापण्याचे कारण काय?
आदिक शास्त्री यांच्या नावासाठी वरुण सरदेसाई यांनी जोरदार शिफारस केली होती. आपल्या हक्काच्या मतदारसंघात आणि आपल्या समर्थकाचे तिकीट कापले गेल्याने अनिल परब यांचा संयम सुटला. बैठकीतच त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि वरुण सरदेसाई यांच्याशी त्यांची मोठी खडाजंगी झाली. वाद इतका वाढला की, अनिल परब बैठकीत तडक उठून बाहेर गेले.
वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यातील या वादाला केवळ महापालिका निवडणुकीचे तिकीट कारणीभूत नाही, तर त्याला गेल्या विधानसभा निवडणुकीतील मतभेदाची किनार असल्याचे बोललं जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील महत्त्वाच्या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याने उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
