मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात नांदूर नाका परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागात एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. नव्याने सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने चार ते पाच जण जखमी झाले आहे. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/nashik-news-2026-03-252fc42494f4f9d60a9ed0b368b2b0da.mp4"][/video]
advertisement
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅब खाली दबून जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने बाहेर काढण्यात आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. जखमी मजुरांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जणांना शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. दोन जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. मात्र, इमारतीचा स्लॅब कशामुळे कोसळला याचं कारण अद्याप समोर आलं नाही. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. बचावकार्य सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
