उत्तमराव जानकर यांनी विधानसभेला राम सातपुते यांना पराभूत केले होते. तेव्हापासून मोहिते पाटील-जानकर यांचे माळशिरसच्या राजकारणावर विशेष वर्चस्व राहिले. परंतु तरीही सातपुते गटाने मागे न हटता दोन्ही गटांविरोधात संघर्ष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातपुते यांना विशेष ताकद दिली. माळशिरसच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांनी पत्नी संस्कृती सातपुतेंना उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले.
advertisement
विजयानंतर सातपुतेंनी मोहिते पाटील-जानकरांना डिवचले
दहिगावमधून विजय मिळवल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील-जानकरांना डिवचले. माळशिरसमधून भाजपचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायचीये, अशा शब्दात त्यांनी बोचरा वार केला. आम्ही बाजू सत्याची होती, जनतेने आम्हाला स्वीकारले, असे राम सातपुते म्हणाले.
विजयानंतर कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष
संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अक्षरश: गुलालात न्हाऊन निघाले. ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्ते आनंदाने नाचले. राम सातपुते आणि संस्कृती सातपुते यांनीही विजयी आनंद साजरा केला.
