TRENDING:

Solapur Crime : 'माझं हसू झालंय गं...', सासरच्यांना कंटाळून पायलने स्वत:ला संपवलं; तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?

Last Updated:

Solapur Crime married women ends life : पायलच्या माहेरच्या फिर्यादीवरून आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप झाला. तशी फिर्यादही पोलिसांना देण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Solapur Crime News : कौटुंबिक त्रासाला कंटाळून माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे पायल रणदिवे या विवाहितेने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर पायलने सुसाईड नोटही लिहून ठेवले. या घटनेनंतर पायलचा नवरा आणि सासू-सासर्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. पायलच्या माहेरच्या फिर्यादीवरून आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप झाला. तशी फिर्यादही पोलिसांना देण्यात आली. यानुसार नातेपुते पोलिसांनी पायलचा नवरा आणि सासू सासऱ्यांना अटक केली आहे. पण पायलने सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
Solapur Crime married women payal randive ends life
Solapur Crime married women payal randive ends life
advertisement

ब्युटी पार्लर सुरू करायचं होतं

पायल रणदिवे या महिलेला स्वत:चा बिझनेस सुरू करायचा होता. तिला तिचं ब्युटी पार्लर सुरू करायचं होतं. त्यासाठी तिने क्लास देखील पूर्ण केला होता. मात्र, सासरच्यांनी तिचा क्लास देखील बंद केल्याने पायलला राग आला. ती काही काळ नैराश्यात होती. तसेच सासर सोडून गेल्यावर आई वडिलांना नावं ठेवतील, अशी भीती देखील तिच्या मनात होती. शेवटी सहन न झाल्याने पायलने टोकाचं पाऊल उचललं. तिने आपल्या हातावर सगळं काही लिहिलंय.

advertisement

पायलने तळहातावर काय लिहिलंय?

हसू झालंय माझं... माझं पार्लर बंद केलं गेलं... जीव होता तो माझा.. स्वप्न होतं गं... आजपर्यंत शांत बसले पण आता नाही.. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले... माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते.. SORRY... अशी सुसाईड नोट महिलेने तिच्या हातावर लिहिली आहे.

advertisement

आत्महत्या नसून हत्या?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

दरम्यान, पायलच्या माहेरच्या फिर्यादीवरून आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप झाला. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट येतोय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोलापूर पोलीस या प्रकरणात गांभीर्याने घेत असून लवकरात लवकर प्रकरणाचा छडा लावला जावा, अशी मागणी गावकरी करताना दिसत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : 'माझं हसू झालंय गं...', सासरच्यांना कंटाळून पायलने स्वत:ला संपवलं; तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल