सुनेत्रा पवार यांच्या पत्राचा अर्थ काय?
निवडणूक आयोगाला सोपवलेल्या कागदपत्रांमध्ये पहिल्या पानावर निवडणूक आयोगाला २८ जानेवारी म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ते १० मार्च सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होईपर्यंत यादरम्यान कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. या मुद्द्यानुसार सुनेत्रा पवार यांची निवडच धोक्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. कारण याच काळात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात देखील पत्र व्यवहार झाला आहे. त्यामुळे तो ही रद्द होऊ शकतो, असे अनेक जण अर्थ काढत होते.
advertisement
बाजू कशी पलटली?
मात्र, निवडणूक आयोगाला २८ जानेवारी ते १० मार्च मधील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र देताना सुनेत्रा पवारांनी त्यात 'In this regard' असा उल्लेख केला आहे. याचा अर्थ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन ( National Convention) संदर्भातील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असा अर्थ होतो. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय अधिवेशन (National Convention) संदर्भातील पत्रव्यवहार वगळता बाकी सर्व पत्रव्यवहार ग्राह्य होतो.
पार्थ पवार यांच्या संदर्भाने ते पत्र निवडणूक आयोगाला लिहिलेलंच नाही
त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यासोबत झालेला आहे , निवडणूक आयोगासोबत नाही. त्यामुळे त्यातही कोणती अडचण नसल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगितले गेले आहे.
त्यामुळे कोणतेही पत्र परत घेण्याचा प्रश्नच नाही. दुसरा मुद्दा म्हणजे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सहीने पाठवलेले पत्र रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. तसंच पत्रात संवैधानिकदृष्ट्या चुका असत्या तर सदर पत्र हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं असतं का? त्याचबरोबर पत्रात चुका असत्या तर तशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या असत्या, असे सुनेत्रा पवार यांच्या निवटवर्तीय नेत्याने सांगितले.
