TRENDING:

राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष ठरला, 15 दिवसात होणार निवड, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

Last Updated:

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य आणि नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. सुरुवातीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे अध्यक्ष होतील, अशा चर्चा होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या देखील नावाची चर्चा होती.
News18
News18
advertisement

मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'राष्ट्रीय अध्यक्ष'पदी निवड होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. येत्या १५ दिवसांत या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा

advertisement

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावरच पसंती दर्शवली आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता संघटनेचे सर्वोच्च पदही त्यांच्याकडे देऊन पक्ष पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

advertisement

पुण्यातील सर्किट हाऊसवर भेटीगाठींचा ओघ

काल सकाळपासूनच उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील सर्किट हाऊस येथे तळ ठोकून आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांच्या त्या भेटी घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार आणि जय पवार हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधूदेखील सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

advertisement

विलीनीकरणाबाबतची भूमिका स्पष्ट

दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून वेगवेगळी विधाने येत आहेत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, आधी राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतरच विलीनीकरणाबाबतची पुढील चर्चा किंवा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

पुढील १५ दिवस महत्त्वाचे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून, अजित दादांनंतर पक्षाला सावरणारा चेहरा देण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन आठवड्यांत होणाऱ्या या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष ठरला, 15 दिवसात होणार निवड, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल