हाच तो सरपंच...
दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच... याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं...! दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली. अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
advertisement
किरीटचं वस्त्रहरण, नशेडींना फोनवर ऍक्सेस
किरीटचं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे. जिथे लोकांना मंत्रालयाचे अनेक महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथं अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
पाहा Video
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारींनंतर DYSP अंजना कृष्णा घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. याच वेळी एका स्थानिक शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून, त्यांचं बोलणं DYSP कृष्णा यांच्याशी करून दिलं होतं.