तेजस ठाकरे यांच्यावर बुधवारपासून मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना गिरगांव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू असून आता तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळते आहे.
रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे सध्या असल्याचे कळते. ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
advertisement
महापालिका निवडणुकांत तेजस ठाकरे यांनी प्रचारातही आपला सहभाग नोंदवला. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या शाखाभेटी कार्यक्रमात तेजस ठाकरे आघाडीवर होते. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबरोबर तेजस ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतल्या अनेक शाखांना भेटी दिल्या. एकंदर राजकीय दृष्ट्या देखील तेजस ठाकरे सजग आहेत.
कोण आहेत तेजस ठाकरे, ते काय करतात?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तेजस ठाकरे हे कनिष्ठ सुपुत्र आहेत
तेजस ठाकरे यांची मुख्य ओळख वन्यजीव संशोधक म्हणून आहे
फेब्रुवारी 2016 मध्ये ठाकरे यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या 5 नवीन प्रजाती शोधून काढल्या
त्यापैकी एकाला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले.
पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या काही प्रजाती शोधून काढल्या
सप्टेंबर 2019 मध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली
या शोधात दिलेल्या योगदानाबद्दल या प्रजातील बोईगा ठाकरे असे नाव देण्यात आले.
