TRENDING:

MIM ने घेरलं, जिवलग मित्रही विरोधात, आव्हाडांची आमदारकी संकटात होती मार्ग पण काढलाच, गणित जुळवलं!

Last Updated:

ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेता बसवणे एक पक्षाला शक्य नाहीये. ⁠यामुळे दोन पक्ष एकत्रित आले तरच विरोधी पक्ष नेता होऊ शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेत अजित पवार गटाचा विरोधी पक्ष नेता होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगणार असल्याचे सूचक वक्तव्य मनोज प्रधान यांनी केले. या खेळीमागे जितेंद्र आव्हाड यांची रणनीती असल्याचे कळते. विधानसभा निवडणूक सोपी जाण्यासाठी नजीब मुल्ला यांना ताकद देण्याची खेळी आव्हाड यांनी खेळल्याची चर्चा आहे.
जितेंद्र आव्हाड-नजीब मुल्ला
जितेंद्र आव्हाड-नजीब मुल्ला
advertisement

लोकसभेत कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून चांगले यश मिळाले आणि उबाठाच्या वैशाली दरेकर यांना कळवा मुंब्रा विधानसभेतून भरघोस मते मिळाली. हाच पॅटर्न विधानसभेत चालला आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड प्रचंड मतांनी निवडून आले. पण ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र कळवा आणि मुंब्रा विधानसभेतून शरद पवार गटाला पर्यायाने जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसला. कारण मुंब्र्यातून ९ नगरसेवक अजित पवार गटाचे निवडून आले तर कळव्यातून शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मतदारसंघ खालसा होणार याची भीती असल्याने जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठी खेळी खेळलीये. त्याचे सुतोवाच शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख मनोज प्रधान यांनी केलंय. ठाणे महानगरपालिकेत अजित पवार गटाला विरोधी पक्ष नेता पद देऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे.

advertisement

राजकीय खेळीमागे जितेंद्र आव्हाड यांची रणनीती

ठाण्यात महायुतीला मिळालेल्या बहुमतानुसार विरोधी पक्ष नेता बसवणे एक पक्षाला शक्य नाहीये. ⁠यामुळे दोन पक्ष एकत्रित आले तरच विरोधी पक्ष नेता होऊ शकतो. हे गणित जुळवून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा असताना मनोज प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ठाण्यात राजकीय खळबळ उडालीये. या खेळीमागे जितेंद्र आव्हाड यांची रणनीती असल्याची चर्चा आहे.

advertisement

जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय खेळीमागचे कारण काय?

-मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडा यांना विधानसभेला मोठे मताधिक्य मिळाले होते. ⁠

-ठाणे पालिका निवडणुकीत आव्हाडांना मुंब्रा कळवा भागात मोठे नुकसान झाले. ⁠

-⁠याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी त्यांचे जुने सहकारी नजीब मुल्ला यांना विरोधी पक्ष नेते पद दिले तर मुंब्रा कौसा भागात आव्हाडांची ताकद पुन्हा वाढेल

advertisement

-आगामी विधानसभेला त्यांना निवडणूक जड जाणार नाही

कारण MIM ने आव्हाडांनी थेट शिंगावर घेत ५ नगरसेवक मुंब्र्यातून निवडून आणल्याने MIM विधानसभेच्या तयारीला लागले असून संपुर्ण मुंब्रा त्यांना हिरवा करायचा आहे हे त्यांनी आधीच स्पष्ट केलंय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महापालिकेची शाळा आता थेट चंद्रावर, नासाच्या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग,Video
सर्व पहा

आव्हाडांच्या या खेळीने शिवसेना भाजपा सतर्क झाली असून ते देखील कळवा मुंब्र्यात युतीचा चेहरा शोधू लागलेत. यामुळे पुढील विधानसभेपर्यंत आव्हाड विरुद्ध युती असा संघर्ष टोकाला जाणार यात काहीच शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MIM ने घेरलं, जिवलग मित्रही विरोधात, आव्हाडांची आमदारकी संकटात होती मार्ग पण काढलाच, गणित जुळवलं!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल