advertisement

पिंपरी चिंचवड येथील महापालिकेची शाळा आता थेट चंद्रावर, नासाच्या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, असा मिळाला बोर्डिंग पास

Last Updated:

ण्यातील महापालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात, ज्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. अशाच उपक्रमांतून पिंपरी चिंचवड येथील म्हेत्रेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची नावे थेट चंद्राभोवतीच्या प्रवासात जाणार आहेत.

+
 महानगरपालिकेच्या

 महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांची नाव थेट नासाच्या चंद्रयान मोहिमेत सामील 

पुणे: पुण्यातील महापालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात, ज्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. अशाच उपक्रमांतून पिंपरी चिंचवड येथील म्हेत्रेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची नावे थेट चंद्राभोवतीच्या प्रवासात जाणार आहेत. नासाच्या आर्टेमिस-2 चंद्रमोहिमेत या महापालिकेच्या शाळेने सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांची माहिती नासाकडून आर्टेमिस-2 मोहिमेत एका डिवाइसद्वारे पाठवण्यात येणार आहे. तसेच, या मोहिमेची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. याविषयीची शाळेच्या शिक्षिका आनंदी जंगम यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
आनंदी जंगम यांनी सांगितलं की, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच विद्यार्थ्यांना इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी देखील प्रेरित केलं जातं. NASA च्या Artemis 2 चंद्रमोहिम होत आहे. या मोहिमेत व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी नासाकडून नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमच्या शाळेतील 16 शिक्षक आणि 32 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. रजिस्ट्रेशन केलेल्यांना नासाकडून बोर्डिंग पास मिळाले आहेत.
advertisement
सर्व नावे SD कार्डमध्ये टाकून ओरियन यानद्वारे अंतराळवीरांसोबत चंद्राकडे प्रवास करणार आहेत. बोर्डिंग पास मिळालेल्या सर्वांना मेलवर आलेली लिंक उघडून 17 जानेवारीपासून प्रक्षेपणापर्यंतचे महत्त्वाचे क्षण व्हर्च्युअली पाहता येणार आहे. अप्रत्यक्षरीत्या यानद्वारे विद्यार्थ्यांना चंद्रभोवतीच्या प्रवासात जाण्याची संधी भेटली आहे. याशिवाय पुढील महत्त्वाच्या घटना आणि नासाचे उपक्रम या विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा दुहेरी फायदा होणार आहे.
advertisement
नासाची आर्टेमिस-2 मोहिम एप्रिलमध्ये प्रक्षेपित
नासाची आर्टेमिस-2 ही सुमारे 10 दिवसांची मोहिम आहे. ही मोहिम फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरहून एप्रिल महिन्यात प्रक्षेपित होणार आहे. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे 4,600 मैलांचा प्रवास करून सॅन दिएगो किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरणार आहेत. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच तसेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन हे एसएलएस (स्पेस लॉन्च सिस्टम) रॉकेटद्वारे ओरियन यानातून अवकाशात झेप घेणार आहेत. याच यानात विद्यार्थी व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवड येथील महापालिकेची शाळा आता थेट चंद्रावर, नासाच्या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग, असा मिळाला बोर्डिंग पास
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement