जवळचे मित्र मानलं, त्यांनीच लुटलं; 'सैराट'च्या 10 वर्षांनी तानाजी गळगुंडेचा मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sairat Actor Tanaji Galgunde : सैराट फिल्मच्या यशानंतर आलेल्या वाईट अनुभवांबाबत फिल्ममधील लंगड्या म्हणजे अभिनेता तानाजी गळगुंडेने नुकताच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
सैराट फिल्म ही आर्ची आणि परश्याची लव्ह स्टोरी असली तरी त्यात परश्या, सल्या, लंगड्या यांची मैत्रीही पाहायला मिळाली. फिल्ममध्ये कधीही परश्याची साथ देणारा लंगड्या म्हणजेच अभिनेता तानाजी गळगुंडे ज्याने खऱ्या आयुष्यातही मित्रांवर तितकाच जीव ओतला मात्र त्याच मित्रांनी त्याची फसवणूक केली. सैराटनंतर आपल्याला आपल्या जवळच्याच मित्रांनी लुटलं असं त्याने सांगितलं आहे.
advertisement
advertisement
तानाजी म्हणाला, सैराट चित्रपटानंतर खरं तर माझ्याकडं चांगले पैसे आले होते. या पैशाचं काय करायचं हे माहिती नव्हतं. आपल्या गावाकडील माणसांचं आर्थिक अज्ञान असतं. त्यावेळी काही मित्र आले, कुणी म्हटलं आपण बिझनेस टाकू, पैसे दे, वाढवून देतो, असं म्हटलं. तर कुणी आपल्याला पैशांची गरज नंतर देतो, असं सांगून पैसे मागून घेतले आणि मी सगळे पैसे त्यांनाच देऊ टाकले.
advertisement
advertisement









