advertisement

40 ओव्हरची थरारक मॅच, पण त्या 6 बॉलनी संपूर्ण सामना फिरला; वर्ल्डकपमधील मोठ्या उलटफेरचं स्वप्न भंगलं, कॅच सुटला अन् मॅचही गेली

Last Updated:

T20 World Cup: आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स लढतीत थरार शिगेला पोहोचला. अखेर फक्त एका ओव्हरने सामन्याचा निकाल पूर्णपणे उलटवून टाकत पाकिस्तानने अविश्वसनीय विजय मिळवला.

News18
News18
कोलंबो: आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरूवात झाली असून आज पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त चुरस पहायला मिळाली. पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात झालेल्या मॅचचा निकाल धक्कादायक लागले असे वाटत होते. पण फक्त एका ओव्हरने संपूर्ण निकाल बदलून टाकला.
पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने सर्वबाद 147 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल पाकिस्तानचा संघ चांगलाच अडचणीत आला होता. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला धावाच करून दिल्या नाही आणि एका बाजूने नियमीत अंतराने विकेट देखील घेतल्या. यामुळे अखेरच्या 12 चेंडूत पाकिस्तानला तब्बल 29 धावांचे करण्याचे टार्गेट होते आणि त्यांच्या 7 विकेट पडल्या होत्या.
19वी ओव्हर टाकण्यासाठी लोगान व्हॅन बीकने चेंडू हातात घेतला आणि समोर होते पाकिस्तानचा फहीम अश्रफ. त्याने या ओव्हरला तब्बल 24 धावा कुटल्या आणि मॅच पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने फिरवली. पहिल्या बॉलवर फहीमने सिक्स मारली त्यानंतर नेदरलँड्सकडे एक सुवर्ण संधी आली होती. फहीमने हवेत मारलेल्या चेंडूवर त्याला बाद करण्याची संधी होती. मात्र नेदरलँड्सच्या खेळाडूने कॅच सोडला आणि ही संधी फहीमने सोडील नाही. त्यानंतर त्याने 2 सिक्स आणि एक चौकार मारून 24 धावा वसूल केल्या. ज्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या 6 चेंडूत फक्त 5 धावा टार्गेट शिल्लक राहिले.
advertisement
धक्कादायक म्हणजे ज्या 19व्या ओव्हरला पाकिस्तानने 24 धावा केल्या त्याच्या 11 ओव्हर आधी म्हणजेच 8व्या ओव्हरला पाकिस्तानने ११ धावा केल्या होत्या. त्यानंतर झालेल्या मधील 11 ओव्हरमध्ये पाकिस्तानला एकाही ओव्हरमध्ये दुहेरी धावसंख्या काढता आली नव्हती.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 47 तर फहीमने 11 चेंडूत 3 सिक्स आणि 2 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. मॅच झाल्यानंतर बोलताना फहीम म्हणाला, आम्ही गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारचे क्रिकेट खेळत आहोत. हृदयाचे ठोके कमी-जास्त होत राहतात, असे यापूर्वीही अनेकदा घडले आहे, त्यामुळे आम्हाला त्याची सवय झाली आहे. मी आणि शाहीन विकेट्स वाचवण्याबद्दल बोलत होतो, आम्हाला माहित होते की आम्ही एकाच षटकात काहीही करू शकतो. जेव्हा चेंडू हवेत असतो, तेव्हा तो फक्त खाली पडावा असे वाटते. सामने शक्य तितक्या लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
40 ओव्हरची थरारक मॅच, पण त्या 6 बॉलनी संपूर्ण सामना फिरला; वर्ल्डकपमधील मोठ्या उलटफेरचं स्वप्न भंगलं, कॅच सुटला अन् मॅचही गेली
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement