advertisement

भाजपविरोधात बंड करायचं ठरलं, अर्जही घ्यायला सांगितले पण तेवढ्यात शिंदेंचा फोन, शिरसाटांना धक्का, निवडणूकच फिरली!

Last Updated:

शिरसाट यांनी आपल्या समर्थकांना उपमहापौर पदासाठी अर्ज घेण्यास सांगितले होते. शिवसेनेने अधिकृत पत्र काढल्यानंतरही बंडखोरी करत शिरसाट समर्थक अर्ज दाखल करण्यास निघाले होते. मात्र...

संजय शिरसाट-एकनाथ शिंदे
संजय शिरसाट-एकनाथ शिंदे
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर कडाकडा भांडणारे शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष शेवटच्या क्षणी एकत्र आले. भाजपकडून महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला. या दोघांनीही अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेत नाराजीनाट्य पाहायला मिळालं.
शिवसेना पक्ष कार्यालयाकडून छत्रपती संभाजीनगरमधील उपमहापौरपदासाठी पक्षादेश काढण्यात आला. मात्र, शिरसाटांना जंजाळांचं नाव मान्य नव्हतं. इतकंच नव्हे त्यांनी महायुतीच्या पत्रकार परिषदेत जाण्याचे देखील टाळले. उपमहापौर पद शिवसेनेचे असले तरी शिवसेनेने नाव घोषित न करता पत्रकार परिषदेमध्ये भाजपने हे नाव घोषित केले.

शिरसाट यांनी प्लॅन केला पण फेल गेला

त्यानंतरही शिरसाट यांनी आपल्या समर्थकांना उपमहापौर पदासाठी अर्ज घेण्यास सांगितले होते. शिवसेनेने अधिकृत पत्र काढल्यानंतरही बंडखोरी करत शिरसाट समर्थक अर्ज दाखल करण्यास निघाले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी समज दिल्यानंतर हे समर्थक अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरले आणि हे नाराजी नाट्य शमवले.
advertisement

शिवसेनेचे नावही भाजपने जाहीर केले 

छत्रपती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र ही घोषणा पालकमंत्री संजय शिरसाठ यांना मोठा धक्का देऊन गेली. भाजपाचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार हे निश्चित झाले. त्यानंतर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी नाव घोषित करायचे होते. मात्र राजेंद्र जंजाळ यांचे नाव शिवसेनेने घोषित न करता भाजपाने घोषित केले.
advertisement

भाजपचा शिरसाट यांना धक्का

ज्यावेळेस उपमहापौर पदासाठी अर्ज घ्यायचे होते. त्यावेळेस जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज घेतला. तिथेच संजय शिरसाट यांनी आपल्या समर्थकांना देखील अर्ज घेण्यास सांगितले. मात्र संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी अर्ज जमा करायच्या आधीच शिवसेना समन्वयक विलास पारकर आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासहित शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे भाजपा कार्यालयात पोहोचले. त्याच ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी भाजपा महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित केले. त्यासोबतच शिवसेनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराचे देखील नाव घोषित केले. एकंदर संजय शिरसाट यांना डावलून भाजपाने नाव घोषित केल्याने ते प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
advertisement
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्री अतुल सावे यांना फोनवरून आपण राजेंद्र जंजाळ यांचे नाव घोषित करावे असे सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या मुलीला म्हणजेच हर्षदा शिरसाट, तसेच निकटवर्तीय अनिता घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांना अर्ज घेण्यास सांगितले होते. भाजप कार्यालयात शिवसेनेच्या उपमहापौराचे नाव निश्चित झाल्यानंतरही शिरसाट समर्थक हे आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना फोन करून सक्त ताकीद दिली. त्यानंतर अर्ध्या रस्त्यामध्ये बंडखोरी करण्यासाठी आलेले शिवसेनेचे उमेदवार माघारी फिरले. त्यानंतर हे बंड थंड झाले. मात्र संजय शिरसाट यांची पक्षातच गोची होत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपविरोधात बंड करायचं ठरलं, अर्जही घ्यायला सांगितले पण तेवढ्यात शिंदेंचा फोन, शिरसाटांना धक्का, निवडणूकच फिरली!
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement