advertisement

Success Story : मामाचा सल्ला ऐकला अन् नोकरीचा राजीनामा दिला, गावकडच्या तरुणाची आता लाखात कमाई

Last Updated:

या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 7 ते 8 लाखांची उलाढाल होते. याबरोबर पत्तरवाळी व्यवसायातून तीन जणांना रोजगार मिळत आहे.

+
उच्चशिक्षित

उच्चशिक्षित तरुणाचा यशस्वी उद्योग ; पत्तरवाळी, पेपर कप निर्मिती, कमाई पहा किती !

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंभेफळ येथील शुभम शेळके हे शेंद्रा एमआयडीसी येथे पत्तरवाळी निर्मितीचा व्यवसाय गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. किराणा दुकानदार यांना पत्तरवाळी, द्रोण, ग्लास या ठिकाणाहून वितरण केले जाते. लग्न समारंभ, अखंड हरिनाम सप्ताह, वाढदिवस, यासह विविध ठिकाणी या पत्तरवाळींची विक्री केली जाते. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला 7 ते 8 लाखांची उलाढाल होते. याबरोबर पत्तरवाळी व्यवसायातून तीन जणांना रोजगार मिळत आहे. शुभम बरोबरच त्याच्या आई-वडील देखील या व्यवसायात त्याची मदत करतात. तसेच पत्तरवाळी व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पत्तरवाळी व्यवसायाची कल्पना कशी?
कुंभेफळ येथील शुभम शेळके हा उच्चशिक्षित तरुण व्यवसाय क्षेत्रात येण्याअगोदर कंपनीमध्ये जॉब करत होता. मात्र जॉबऐवजी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा हा विचार नेहमी मनात असायचा त्यामुळे मेटे (शुभमचे मामा) यांनी पत्तरवाळी व्यवसायाची कल्पना सुचवली व यावर योग्य मार्गदर्शन केले, आणि हा व्यवसाय सुरू केला. पत्तरवाळी, द्रोण, नाश्ता प्लेट, पेपर कप यासह विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती या ठिकाणी केली जाते.
advertisement
पत्तरवाळी निर्मितीसाठी यंत्राचा वापर
नाश्ता प्लेट, पत्तरवाळी, पेपर कप तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक यंत्राचा वापर केला जातो त्या यंत्राला रोलर मशीन देखील म्हटले जाते. सुरुवातीला त्या यंत्रामध्ये साचा बसवला जातो, त्या साच्यामध्ये डिझाईन व आकार महत्त्वाचा असतो. साचा बसवल्यानंतर पत्तरवाळीसाठी वापरला जाणारा पेपर त्या ठिकाणी टाकला जातो, पेपर बरोबर त्या साच्याखाली आला की साच्याच्या आकाराची पत्तरवाळी तयार होते. याचप्रमाणे नाश्ता प्लेट आणि पेपर कपसाठी यंत्राचा वापर होतो.
advertisement
तरुणांनी या व्यवसायात यावे का?
पत्तरवाळी बनवणे व विक्री करणे हा व्यवसाय चांगला व योग्यरित्या केल्यास फायदेशीर देखील आहे. तसेच तरुणांना या व्यवसायाबद्दल संपूर्ण मार्गदर्शन देखील या ठिकाणी आल्यानंतर केले जाईल. व्यवसाय सुरू करण्याअगोदर नवव्यावसायिकांनी ज्या पत्तरवाळी तयार केली जाते अशा चार ते पाच प्लांटला भेट द्यावी, माहिती घ्यावी त्यानंतरच टप्प्याटप्प्याने सुरुवात करावी यासाठी जवळपास 1.50 लाखांपर्यंत खर्च येतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : मामाचा सल्ला ऐकला अन् नोकरीचा राजीनामा दिला, गावकडच्या तरुणाची आता लाखात कमाई
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement