advertisement

Beauty Tips : BB, CC आणि DD क्रीम.. यामध्ये नेमका काय फरक असतो? तुमच्या त्वचेसाठी योग्य कोणतं?

Last Updated:
हल्ली मुली रोज मेकअप करतात. मग तो हलका का असेना. प्रेझेंटेबल राहण्यासाठी रोज हेव्ही मेकअप कारण शक्यही नसतं. अशात BB, CC आणि DD क्रीम्स फायदेशीर ठरतात.
1/9
रोज या BB क्रीम, CC क्रीम आणि DD क्रीमची मदत घेऊन बऱ्याच मुली आपला हलका मेकअप लूक मिळवतात. पण यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो आणि आपल्या त्वचेनुसार याचा वापर खरंच बदलतो का? बदलत असेल तर तो कसा? चला पाहूया.

2/9
BB, CC आणि DD क्रीम यांना 'मल्टी-टास्किंग प्रोडक्ट्स' म्हंटलं जातं. म्हणजेच त्या एकाच क्रीममध्ये मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि हलका मेकअप या सर्वांचे मिश्रण असतात. पण तरीही या तिन्ही क्रीम्स वेगवेगळ्या सतत प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य असते.

3/9
बीबी क्रीम्स रोजच्या वापरासाठी चांगल्या असतात. त्यांना ब्यूटी बाम किंवा ब्लेमिश बाम असंही म्हणतात. ज्यांना हेव्ही मेकअप नको असतो त्यांच्यासाठी ही क्रीम बेस्ट आहे. या क्रीममुळे त्वचेला हलके कव्हरेज मिळते आणि ओलावा टिकून राहातो. कॉलेज किंवा ऑफिस लूकसाठी ही क्रीम योग्य असते. ही क्रीम तुम्हाला बऱ्यापैकी नैसर्गिक लूक देते. यामुळे त्वचेवरचे हलके डाग लपतात, त्वचेचा रंग एकसमान दिसतो आणि याने तुम्हाला सनस्क्रीनचेही फायदे मिळतात.

4/9
सीसी क्रीम्स रंग सुधारण्यात उत्तम असतात. त्या कलर करेक्टरचं काम करतात. त्वचेवरील लालसरपणा, पिगमेंटेशन किंवा काळे डाग असे प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर तुम्ही हे क्रीम वापरायला हवं. टॅनिंग किंवा त्वचेवर गडद रंगाचे डाग असल्यास हे क्रीम तुम्हाला चांगला लूक देऊ शकतं. बीबी क्रीमपेक्षा हे क्रीम तुम्हाला थोडं जास्त कव्हरेज देतं.

5/9
डीडी क्रीम्स म्हणजे डेली डिफेन्स किंवा डायनॅमिक डू-ऑल. हे बीबी आणि सीसी क्रीमपेक्षा जास्त फायदे देतं. हे क्रीम सुरकुत्या कमी करण्यास, त्वचा घट्ट करण्यास आणि तेल नियंत्रण करण्यास मदत करते.

6/9
तुमच्या चेहऱ्यावर बारीक रेषा दिसू लागल्या असतील किंवा तुम्हाला आत्तापासून त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर डीडी क्रीम एक चांगला पर्याय असू शकते. पण ही क्रीम प्रत्येकासाठी किंवा तरुण त्वचेसाठी योग्य असेलच असं नाही.

7/9
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे एकच क्रीम प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. म्हणून कोरड्या किंवा सामान्य त्वचाहेसाठी बीबी क्रीम वापरावी. पिगमेंटेशन किंवा असमान रंग दिसायला नको असेल तर सीसी क्रीम वापरावी आणि वाढत्या वयात त्वचेची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही डीडी क्रीम वापरून पाहू  शकता.

8/9
त्वचेला आर्द्रता आणि कव्हरेज दोन्ही देण्यासाठी बरेच लोक हल्ली या क्रीम्सचे मिश्रण वापरतात. जसं की बीबी आणि सीसी क्रीम्सचं मिश्रण. सौंदर्य तज्ञांच्या मते, आजकाल लोक जड फाउंडेशनपेक्षा हलक्या, त्वचेसाठी चांगल्या क्रीम्स वापरण्याला प्राधान्य देत आहेत. बीबी आणि सीसी क्रीम्स उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वापरल्या जातात कारण त्या त्वचेवर जड वाटत नाहीत.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement